मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांची गेल्या काही दिवसांत हिंदी चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सचिन खेडेकर, वैभव तत्त्ववादी, महेश मांजरेकर, प्रिया बापट यांच्या जोडीला आता आणखी एक मराठमोळा अभिनेता हिंदी कलाविश्वात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘मोरया’ चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता संतोष जुवेकरला मोठी संधी मिळाली आहे.

अभिनेता संतोष जुवेकर लवकरच बॉलीवूड स्टार विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. विकी सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘छावा’ चित्रपटासाठी दिवसरांत्र मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. संतोषने सुद्धा त्याचं शूटिंग शेड्यूल नुकतंच पूर्ण केलं आहे. याचा अनुभव त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर करत सांगितला.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Akshaya Deodhar and Hardeek Joshi
राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : फक्त १५ मिनिटांची डेट अन् सायली चालवणार स्कूटर, मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?

संतोष लिहितो, “फायनली माझं शूट संपलं. पण, शूटिंगचे दिवस आठवणीत राहतील कारण, उत्तम कलाकारांची आणि टीमची साथ असेल, तर काम बहारदार रंगतं आणि मनही कामात रमतं. या क्लिपमधून तुम्हाला आम्ही सेटवर केलेल्या मस्तीची कल्पना येईल. पण, मला खात्री आहे सिनेमाचा पहिला ट्रेलर येईल तेव्हा आम्ही काम करताना काय तोडफोड मेहनत केलीये याची सुद्धा कल्पना येईल.”

सर्वांचे आभार मानत अभिनेता पुढे लिहितो, “आम्ही कलाकार जेव्हा एखादा नवीन काम करतो तेव्हा नवीन माणसांची, नवीन मित्रांची ओळख होते आणि एक नवीन कुटुंब तयार होत असतं. आमच्या आयुष्यात आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात म्हणून माझ्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माझं खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप मोलाची साथ दिलीत.”

हेही वाचा : “Happy birthday राव”, नवऱ्याच्या वाढदिवशी मृण्मयी देशपांडेची खास पोस्ट; म्हणाली, “तुझ्या पाठीशी…”

“लक्ष्मण उतेकर सर तुम्ही, दिग्दर्शनाची टीम, आपली संपूर्ण @maddockfilms production टीम, आपले DOP सौरभ सर, बबलू सर, फाइट सीक्वेन्स डिरेक्टर परवेज भाई व त्यांची टीम, आपल्याला सर्वांना आनंदाने खाऊपिऊ घालणारे डिपार्टमेंटवाले तुम्हा सगळ्यांना एक प्यारवाली झप्पी. विकी कौशल पाजी, आशिष, अंकित, शुभांकर, बालाजी सर, प्रदीप सर तुम्हा सर्वांना खूप प्रेम. आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीला आई भवानीचा , छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि मायबाप रसिकांचा आशीर्वाद लाभुदे हीच इच्छा आणि प्रार्थना. चला भेटूयात लवकरच तोपर्यंत जय भवानी!” अशी पोस्ट संतोषने शेअर केली आहे.

दरम्यान, बहुचर्चित ‘छावा’ चित्रपट यंदाच्या वर्षाखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. यामध्ये विकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Story img Loader