अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. २०२३ हे वर्ष सान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून तिचे ‘जवान’, ‘सॅम बहादूर’सारखे दर्जेदार चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटात सान्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे सान्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा : अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ फेम आयुष-बरखाने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाले…
शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती यांच्यासह ‘जवान’मध्ये सान्या मल्होत्रासुद्धा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक अॅटली ‘जवान’साठी विशेष तयारी करीत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल असे सांगण्यात येत आहे. या निमित्ताने ‘कोईमोई’ने अभिनेत्री सान्या मल्होत्राशी संवाद साधत तिला ‘जवान’ आणि शाहरुखबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारले. यावर सान्या म्हणाली, “आता ‘जवान’बाबत अधिकृत घोषणा झाल्याने मी मोकळेपणाने चित्रपटाबद्दल बोलू शकते, कारण यापूर्वी, तू ‘जवान’मध्ये आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर मी उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. अर्थात कुठेही काहीही न सांगणे हा सुद्धा माझ्या कामाचा एक भाग आहे.”
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा कशी करते मुलांना Impress? अभिनेत्रीने दिलेले उत्तर ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
सान्याने पुढे सांगितले, “आपण ‘जवान’ चित्रपटाचा एक भाग आहोत ही, गोष्ट मी आजवर कोणासमोरही मान्य केली नव्हती. अनेक लोक मला, ‘तू खोटारडी आहेस, खोटं बोलतेस,’ असे म्हणत होते. परंतु मी खोटारडी नसून एखादी गोष्ट ऑफिशियल होईपर्यंत लपवणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे. इन्स्टाग्रामवर जेव्हा मी ‘जवान’ चित्रपटाबाबत माहिती दिली तेव्हा माझ्या अनेक चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. आयुष्यात एकदा तरी किंग खानबरोबर काम केले पाहिजे, अशी माझी इच्छा होती. हे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होणार असून, शाहरुखबरोबर ‘जवान’मध्ये काम करणे हे स्वप्नवत आहे.”
“दंगल चित्रपटाबाबत माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनाही माहिती नव्हते. जेव्हा त्यांनी वर्तमानपत्रात, मीडियामध्ये पाहिले तेव्हा मला अनेकांनी फोन केले. कोणालाही काहीही न सांगणे हे माझे कर्तव्य आहे. पण, आता मी ‘जवान’चा एक भाग आहे हे सर्वांना सांगताना मला खरेच खूप आनंद होतो,” असे सान्याने मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.
अॅटली दिग्दर्शित आणि शाहरुख खान, नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.