Saif Ali Khan Attacked With Knife At Home : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. हा दरोडेखोर सैफ-करीनाच्या वांद्रे पश्चिम येथील राहत्या घरी मध्यरात्री शिरला होता. सैफ आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी पुढे आला असता या चोराने अभिनेत्यावर वार केले.

अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान करीना कपूर वांद्रे येथील घरी होती. करीनासह तैमूर आणि जेह हे दोघंही घरीच होते. आपल्या कुटुंबीयांचं संरक्षण करण्यासाठी सैफ या चोराला सामोरा गेला मात्र, यादरम्यान त्याच्याजवळ कोणतंही शस्त्र नव्हतं. पण, दरोडेखोराच्या हातात चाकू असल्याने त्याने अभिनेत्यावर वार केल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा : Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग?”, जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली गंभीर शंका

सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इब्राहिम अली खान व सैफच्या घरच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे ३.३० वाजता अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केलं अशी माहिती लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. निरज उत्तमानी यांनी दिली आहे. आता सैफची भेट घेण्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार व कुटुंबीय रुग्णालयात जात आहेत.

सैफची दोन्ही मुलं सारा व इब्राहिम अली खान ( सैफ व अमृता सिंह यांची मुलं ) हे दोघंही वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. याचा व्हिडीओ विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे दोघंही बहीण-भाऊ सगळी कामं रद्द करून वडिलांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

हेही वाचा : “धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…

सैफवर झालेल्या हल्ल्याबाबत आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊन लागल्या आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सैफ लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच अनेकांनी करीना व सैफच्या कुटुंबीयांच्या आम्ही पाठिशी आहोत अशा पोस्ट पूजा भट्ट, कुणाल कोहली या कलाकारांनी शेअर केल्या आहेत.

Story img Loader