Kartik Aaryan Sara Ali Khan :सारा अली खान आणि कार्तिक आर्यन (kartik aaryan) बॉलिवूडमधील फ्रेश ऑनस्क्रीन जोडी आहेत. ते दोघे ‘लव्ह आज कल २’ या सिनेमात एकत्र दिसले होते. सिनेमातील जोडीप्रमाणेच, हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत्या. अनेक दिवस ही चर्चा सुरू राहिल्यानंतर, दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. कार्तिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, साराचं नाव न घेता, कोणतंही नातं संपल्यावर ते सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ नये, असं म्हटलं होतं.

कार्तिकच्या या वक्तव्यामुळे सारा आणि त्याच्यात कोणतंही नातं नाही, असं सर्वांना वाटलं होतं. परंतु, नुकत्याच ‘कॉल मी बे’ या वेबसिरीजच्या स्क्रिनिंगला सारा आणि कार्तिक एकत्र दिसलेआणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. ते फक्त एकत्रच नव्हते, तर दोघांनी एकमेकांना मिठीही मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे दोघे पुन्हा डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडीओत सारा, कार्तिकसह अनन्या पांडे सुद्धा दिसत आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Saif Ali Khan Attacked With Knife At Home
हल्ल्यानंतर सैफच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली लेक सारा अली खान, सोबतीला होता भाऊ इब्राहिम, पाहा व्हिडीओ
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर

हेही वाचा…Video : “संध्याकाळी ५.३० वाजता Dinner, लवकर झोपते अन्…”, लेक वामिकामुळे बदलली अनुष्का शर्माची दिनचर्या; म्हणाली…

सारा अली खान (sara ali khan), कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे एकत्र उभे राहून हास्यसंवाद करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर चाहत्यांनी सारा आणि कार्तिक पुन्हा डेट करत आहेत का, अशी चर्चा सुरू केली आहे. एका चाहत्याने व्हिडीओखाली कमेंट करत लिहिलं आहे, “तुम्ही दोघे लग्न करा, प्लीज,” तर दुसऱ्या एका चाहत्याने विचारलं आहे, “हे पुन्हा डेट करत आहेत का?” एका फॅनने विचारलं, “हे दोघे पुन्हा कुठला सिनेमा एकत्र करणार आहेत का?” सोशल मीडियावर यावरील कमेंट्सना उधाण आलं आहे.

इब्राहिम अली खान आणि कार्तिकच्या गप्पा

कार्तिक फक्त सारा आणि अनन्या पांडेसोबतच दिसला नाही, तर सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खानबरोबरही हसत-हसत संवाद करताना दिसला. हे दोघेही एकमेकांना टाळी देऊन जोरात हसताना या व्हिडीओत दिसत आहेत. कार्यक्रम संपल्यावर इब्राहिम कार्तिकला बाहेर सोडायला येतो आणि त्याला आलिंगन देतो. अस या व्हिडीओमध्ये दिसतंय.

हेही वाचा…आलिया भट्ट करणार लाडक्या भावाचं रक्षण, ‘जिगरा’ची पहिली झलक आली समोर, ‘या’ तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी राज शामानीला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने त्याच्या डेटिंग लाईफबद्दल स्पष्टपणे सांगितलं होतं की, “मला रोमँटिक हिरो म्हणतात, पण प्रेमात मी दुर्दैवी आहे. मी कोणालाही डेट करत नाही.” मात्र सध्या व्हायरल झालेल्या त्याच्या आणि साराच्या आलिंगनाच्या व्हिडीओने त्याच्या डेटिंग लाईफमध्ये नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Story img Loader