अभिनेत्री शहनाज गिलचं फॅन फॉलोइंग खूप जबरदस्त आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच शहनाज तिच्या ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ या चॅट शोमुळे चांगलीच चर्चेत असते. या कार्यक्रमामध्ये मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटीज येतात आणि ते तिच्याबरोबर व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाबद्दल धमाल गप्पा मारतात. याच्या पुढील भागात सारा अली खानने हजेरी लावली आहे. ज्याचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
शहनाज गिल आणि सारा अली खान यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक कोलॅब व्हिडिओ शेअर केला आहे. ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’च्या आगामी एपिसोडचा हा प्रोमो आहे, ज्यामध्ये सारा अली खान तिच्या आगामी ‘गॅसलाइट’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. मात्र, या व्हिडिओ क्लिपमधील दृश्यं सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. हा प्रोमो खास करण्यासाठी सारा आणि शहनाजने ही धमाल केली आहे.
आणखी वाचा : “आपल्या कामाशी बेईमानी…” ए.आर. रहमान यांच्यावर इस्माईल दरबार यांनी केलेला ऑस्कर विकत घेतल्याचा आरोप
या प्रोमो व्हिडिओची सुरुवात शहनाज गिलपासून होते, जी स्क्रीनवर ‘नॉक-नॉक’ करताना दिसत आहे. काही वेळातच, सारा अली खान पडद्याआडून बाहेर येते आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंगचे सुपरहिट गाणे ‘कुंडी माट खडकाओ राजा, सीधा अंदर आओ राजा’ हे गाणे गाण्यास सुरुवात करते. ‘गॅसलाइट’च्या टीझरमध्येही अशाच गाण्याचा वापर केला आहे. हे ऐकून शहनाज पडदा बंद करते आणि दोघी पडद्यामागे काहीतरी करू लागतात. त्यांच्या कृतीवरुन त्या दोघी एकेमेकांना कीस करत असल्यासारखं वाटत आहे.
खरी मजा तेव्हा येते जेव्हा शहनाज बाहेर येते आणि म्हणते की “माझी सर्व लिपस्टिक खराब झाली.” अर्थात हे सगळं या आगामी एपिसोडच्या प्रमोशनसाठीच केलं असल्याचं स्पष्ट होत आहे. केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी हा धमाल व्हिडिओ शूट केला असून त्यात काहीच अश्लील नसल्याचंही स्पष्ट होत आहे. शहनाज गिलच्या या चॅट शोला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सारा अली खानपूर्वी शाहिद कपूर, सुनील शेट्टी, आयुष्मान खुराना आणि कपिल शर्मा यांच्यासह अनेक स्टार्स या कार्यक्रमात धमाल गॉसिप करताना दिसले आहेत.