विकी कौशल हा बॉलीवूडमधील सध्याच्या आघाडीच्या कलाकारांच्या यादीत सामील आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी आणि सारा सध्या या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच प्रमोशनदरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

याच बरोबर विकीच्या वाढदिवशी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. ‘तू है तो मुझे और क्या चाहिये…’ असे या गाण्याचे बोल आहेत. अरिजीत सिंगने हे गाणं गायलं आहे. आता साराने याच गाण्यावरील त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विकीने असं काही केलं की, साराने थेट त्याला लाथ मारल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

सारा आणि विकी एका कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान या व्हिडीओमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहेत. यात विकी ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ या गाण्यावर लिपसिंक करत साराकडे बघत रोमँटिक झालेला आहे. पण इतक्यात विकी साराला बाजूला सारून सेटवर उभ्या केलेल्या म्हशीच्या पुतळ्याकडे जातो आणि तिला ‘तू है तो मुझे और क्या चाहिये’ असं म्हणू लागतो. हे पाहून सारा चिडते आणि तिथेच मागून येऊन त्याला लाथ मारते.

हेही वाचा : ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकी कौशलला पोलिसांनी केली होती अटक, जाणून घ्या नेमकं काय घडलेलं

विकी आणि साराचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे चहाते यावर विविध प्रतिक्रिया देत त्यांचा विनोदी अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. विकी व साराचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होईल.

Story img Loader