बॉलीवूडमध्ये कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिक आर्यनचा आज ३३ वा वाढदिवस आहे. आज संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच कार्तिक आर्यनला त्याची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानने खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साराने कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त ‘लव्ह आजकल २’च्या सेटवरचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत. या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी सारा-कार्तिक वेगळे झाले. ‘कॉफी विथ करण’मध्ये करण जोहरने सारा-कार्तिकच्या रिलेशनशिपबाबत पुष्टी केली. या भागात साराने कार्तिकबरोबर झालेल्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं.

आता एक्स बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त सारा अली खानने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने ‘लव्ह आजकल २’च्या सेटवरचे जुने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कार्तिक” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : “पूर्वापार झालेले संस्कार…”, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पायाखाली वर्ल्डकपची ट्रॉफी पाहून मराठी अभिनेत्याचा संताप! म्हणाले…

कार्तिक आर्यनबरोबर ब्रेकअप झाल्यावर पापाराझींनी क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा अली खान यांना एकत्र पाहिलं होतं. परंतु, ‘कॉफी विथ करण’मध्ये “शुभमन आणि मी एका कॉमन मैत्रिणीमुळे एकमेकांना ओळखतो. तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये” असं साराने सांगितलं.

हेही वाचा : ‘जाऊ बाई गावात’ कार्यक्रमाची वेळ आणि तारीख ‘झी मराठी’ने बदलली! आता राणादा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

दरम्यान, कार्तिक आणि साराने इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आजकल २’मध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. परंतु, आता दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दिवाळीत कार्तिक साराच्या घरी सुद्धा गेला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan birthday wish to kartik aaryan shared instagram post and photos from love aaj kal set sva 00