बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. साराप्रमाणेच तिचा भाऊ इब्राहिम अली खान सुद्धा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याबाबत आता साराने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’फेम अश्विनी महांगडे पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत, पोस्ट शेअर करीत म्हणाली…
सारा अली खान अलीकडेच “कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३” मध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी मुलाखत देताना साराने आपल्या भावाच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल खुलासा केला. सारा म्हणाली, “इब्राहिमने त्याच्या पहिल्या बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. माझा स्वभाव माझ्या आईसारखा आहे, आम्ही दोघी इब्राहिमवर खूप जास्त प्रेम करतो.”
इब्राहिम अली खान प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करु शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची मुले आहेत. सैफ आणि अमृता २००४ मध्ये विभक्त झाले होते. यानंतर सारा आणि इब्राहिम दोन्ही मुले अमृता सिंहबरोबर राहतात.
हेही वाचा : गुजरातच्या गावामध्ये अमिताभ बच्चन यांची नात चालवतेय ट्रॅक्टर; नेटकरी कौतुक करीत म्हणाले…
दरम्यान, सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.