Sara Ali Khan Visits Kedarnath Temple : सारा अली खान दरवर्षी केदारनाथ धामला भेट देते. महादेवाची मनोभावे पूजा करून केदारनाथ परिसरातील फोटो अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते. यंदा मंदिराचे दरवाजे बंद होण्याआधी नुकतीच सारा केदारनाथला गेली होती. यावर्षीच्या ट्रिपदरम्याने फोटो देखील तिने शेअर केले आहेत.

मात्र, तिने शेअर केलेल्या फोटोंव्यतिरिक्त सारा अली खान व सुपरमॉडल अर्जुन प्रताप बाजवा यांचा एक दुसराच फोटो रेडिटवर व्हायरल होत आहे. यावरून सारा पुन्हा एकदा प्रेमात पडली असून ती अर्जुन प्रताप बाजवाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रेडिटवर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सारा ( Sara Ali Khan ) आणि अर्जुन एकत्र बाजूला उभे राहून पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. याशिवाय अर्जुन साराला इन्स्टाग्रामवर फॉलो सुद्धा करतो.

हेही वाचा : प्रथमेश परबने दिव्यांग मुलांसह साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी! त्याच्या पत्नीने लिहिली सुंदर पोस्ट; सर्वत्र होतंय कौतुक

अर्जुन प्रताप बाजवा कोण आहे?

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन प्रताप बाजवा हा एक मॉडेल आणि MMA फायटर म्हणून ओळखला जातो. तसेच पंजाबमधील सध्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष फतेह जंग सिंग बाजवा यांचा तो मुलगा आहे. मॉडेलिंग व्यतिरिक्त अर्जुनचा बॉलीवूडमध्येही सहभाग होता. त्याने सिंग इज ब्लिंग सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय अर्जुनचा राजकारणाशी देखील जवळचा संबंध आहे. २०२२ मध्ये पंजाब जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाचा तो सगळ्यात तरुण सदस्य होता. त्यानं कृषी विषयात डिग्री घेतली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर

व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

Is this Sara's boyfriend…which reddit was thinking that she is secretly dating
by inBollyBlindsNGossip

हेही वाचा : इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल

आता सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा यांच्या अफेअरच्या चर्चा किती खऱ्या आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय या दोघांनी देखील या प्रकरणी सध्या मौन बाळगलं आहे.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, २०१८ मध्ये अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटातून साराने ( Sara Ali Khan ) मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. यामध्ये सारा अली खान आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं शूटिंग केदारनाथ मंदिर परिसरात सुद्धा करण्यात आलं होतं. तेव्हापासून अभिनेत्री दरवर्षी आवर्जून मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाते.