अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने या चित्रपटात विकी कौशलबरोबर पहिल्यांदाच काम केले होते. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सारा अली खान सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्यात पोहोचली आहे. साराने गोव्यातील बरेच फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

हेही वाचा : 72 Hoorain चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईत तक्रार दाखल; मुस्लीम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप

Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…
shazahn padamsee got engaged to Ashish Kanakia
बॉलीवूड अभिनेत्रीने ३७ व्या वर्षी ‘या’ कंपनीच्या CEO बरोबर गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो पाहिलेत का?
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
vicky kaushal chhaava movie marathi actor santosh juvekar glimpses
‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसली ‘या’ मराठी अभिनेत्याची झलक! गाजलेल्या ‘वादळवाट’ मालिकेत केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?

साराने शेअर केलेल्या बऱ्याच फोटोंमध्ये जेहान हांडा दिसत असल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. या फोटोंमधून अभिनेत्री गोव्यामध्ये जेहान हांडाबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका का लोकप्रिय ठरली? अमेय वाघ कारण सांगत म्हणाला, “आम्ही मित्र…”

अभिनेत्री सारा अली खान आणि जेहान हांडाने यावेळी हिरव्या रंगाच्या शेड्सचे कपडे घातले असून, या फोटोंना अभिनेत्रीने “गो ग्रीन इन गोवा…” असे कॅप्शन दिले आहे. हे दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. यापूर्वीही या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, जेहान किंवा साराने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता दोघांचे गोव्यातील फोटो पाहून पुन्हा एकदा जेहान-सारा डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : Video : कार्तिक-कियाराने एकत्र गायलं रोमॅंटिक गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “यापुढे कधीच एकत्र गाणं…”

दरम्यान, जेहान हांडाने सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. तेव्हापासून या दोघांची घट्ट मैत्री आहे. लवकरच सारा अली खान ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटात आदित्य रॉय कपूरबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २९ मार्च २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader