सारा अली खानचा चित्रपट ‘मर्डर मुबारक’ आजच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. याचबरोबर तिचा ‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपट २१ मार्चला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत साराने सांगितलं की, तिची कोणी कॉपी केली तर तिला आवडत नसे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत साराने सांगितलं की, “जेव्हा मला वाटायचं की मला कोणीतरी कॉपी करतय, तेव्हा मला त्रास व्हायचा. ज्याप्रकारे मी नमस्ते म्हणते, तेसुद्धा कॉपी केलं जायचं आणि हे मी मनापासून करते. मी खरंच लोकांना अशाप्रकारे भेटते, त्यांच्याशी संवाद साधते. मला हे जाणवलं की, खूप मुली याची कॉपी करतात.”

ती पुढे म्हणाली की, आता तिला याचा त्रास होत नाही. कारण ती ज्याप्रकारे बोलते, वागते हे प्रेक्षकांना आता कळून चुकलयं. “जेव्हा मी एअरपोर्ट लूकसाठी विमानतळावर भारतीय पोशाखात आणि ओल्या केसांवर जायचे आणि माझा तो लूक सगळे जण कॉपी करायचे, तेव्हा माझी खूप चिडचिड व्हायची. पण मला जाणवलं की, माझे प्रेक्षक मला ओळखतात. आता त्याचा मला इतका फरक नाही पडत. कारण जे माझी कॉपी करतात त्यांना प्रेक्षकच असं म्हणतात की, “ही तर साराला कॉपी करतेय”, आता मला ते मजेशीर वाटतं.

हेही वाचा… सारा अली खानने पाहिलाय ‘सैराट’ चित्रपट; रिंकू राजगुरूचा उल्लेख करीत म्हणाली…

दरम्यान, साराच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, साराचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपट आजचं (१५ मार्च २०२४ रोजी) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. साराचा लवकरच ‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan gets angry when girls copied her airport look and style dvr