अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सारा अली खानचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. सारा अली खानला तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून ट्रोल केलं जात आहे.
नुकताच देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. या निमित्ताने सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने चाहत्यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टमध्ये तिने देशातील विविध ठिकाणच्या शिव मंदिरातील फोटो शेअर केले होते. पण या फोटोंमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
आणखी वाचा- वडील सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळताच साराची प्रतिक्रिया काय होती? अमृताकडे गेली आणि…
सारा अली खानने “जय भोलेनाथ” असं कॅप्शन देत तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शिवमंदिरात पूजा करताना दिसत आहे. डोक्यावर ओढणी आणि कपाळावर चंदनाचा टिळा लावलेली सारा शिवभक्तीत लीन झालेली या फोटोंमध्ये दिसते. पण साराने मंदिरात जाऊन पूजा करणं काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं नाही आणि त्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा- लग्नाआधीच स्वरा भास्कर प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस
सारा अली खानच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “मुस्लिम असूनही तू मंदिरात जातेस. तुला लाज वाटली पाहिजे.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “मूर्ती पूजा इस्लाममध्ये हरम मानली जाते.” तर आणखी एका युजरने, “तू फक्त नावानेच मुस्लिम आहेस. तुला अनफॉलो करत आहे.” अशी कमेंट केली आहे. दरम्यान काही युजर्सनी मात्र आई- वडिलांच्या दोन्ही धर्मांना समानतेने मानणाऱ्या साराचं कौतुकही केलं आहे. सारा अली खानची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.