‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’ला सुरुवात झाली असून बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री यामध्ये सहभागी होणार आहेत. कान्समध्ये यंदा अनुष्का शर्मा, मानुषी छिल्लर, सारा अली खान, मृणाल ठाकूर या अभिनेत्री पदार्पण करणार आहेत. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’मध्ये पहिल्याच दिवशी सारा अली खान रेड कार्पेटवर आली. तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा : “पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारताना…” प्रिया बापटने सांगितला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये काम करण्याचा अनुभव

shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
vidya balan distributes food and clothes to needy people video viral
Video: गरजूंना वाटले कपडे अन् वडापाव; बॉलीवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “माणुसकी अजून जिवंत आहे”
‘पारू’ फेम शरयू सोनावणेने नवऱ्याचं केलं कौतुक, म्हणाली, “तो रोमँटिक नाही पण…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Sana Khan reveals name of her son shares first family photo
सना खान दुसऱ्यांदा झाली आई, फोटोंमध्ये दाखवली धाकट्या मुलाची झलक; नावही केलं जाहीर
nikki tamboli and usha nadkarni will visit maharashtrachi hasya jatra
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पोहोचल्या निक्की तांबोळी अन् उषा नाडकर्णी! कोकणातील पारंपरिक गाण्यावर धरला ठेका, पाहा प्रोमो
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत

सारा अली खानने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’च्या पहिल्या दिवशीच भारतीय संस्कृतीला साजेसा लेहेंगा परिधान केला होता. साराचा हा लेहेंगा अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला आहे. या लेहेंग्यावर साराने ड्रॉप इअररिंग्स घातले होते. तसेच तिने अगदी लाईट मेकअप केला होता. कान्सच्या रेड कार्पेटवरील भारतीय लूकमुळे सध्या साराची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : ‘तारीख पे तारीख…’ सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडेना, जाणून घ्या कारण

सारा अली खानने कान्स फेस्टिव्हलमधील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करीत साराचे कौतुक केले आहे. यावर एका यूजरने कमेंट करीत, “सारा कायम आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते ही अतिशय चांगली गोष्ट आहे,” असे लिहिले असून दुसऱ्या यूजरने, “आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये भारतीय संस्कृतीप्रमाणे पोशाख करणे ही अतिशय मोठी गोष्ट असून आम्हाला तुझा अभिमान आहे…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सारा अली खान लवकरच विकी कौशलबरोबर ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader