बॉलिवूडची स्टार कीड सारा अली खान सोशल मीडियावर सक्रीय असते. कधी शुभमन गिलमुळे तर कधी चित्रपटांमुळे ती चर्चेत येत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतबरोबर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कार्तिक आर्यनबरोबर ‘लव्हआजकल’हा चित्रपट केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र या जोडीची चर्चा झाली. ब्रेकअपनंतर हे दोघे पुन्हा आता ‘आशिकी ३’मध्ये झळकणार अशी चर्चा असताना अभिनेत्रीने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘आशिकी २’ च्या यशानंतर आता निर्मात्यांनी ‘आशिकी ३’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे. मात्र अभिनेत्रीसाठी अजून शोध सुरु आहे. मध्यंतरी कार्तिक आर्यन व साराच एका फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र अभिनेत्रीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ती असं म्हणाली, “मला हा चित्रपट करायला आवडेलच मात्र अदयाप मला यासाठी विचारणा झाली नाही.” झूम टीव्हीशी बोलताना ती असं म्हणाली.
अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती, म्हणाली, “तीन वर्षांनी…”
साराने आणखीन एका मुलाखतीत ब्रेकपबद्दलचा खुलासा केला आहे ती असं म्हणाली, २०२० साल हे माझ्यासाठी वाईट ठरलं. वर्षाची सुरवात माझ्या ब्रेकअपपासून झाली आणि ते आणखीन पुढे वाईट ठरत गेले.” २०२० साली तिचे ‘लव्ह आजकल २’, ‘कुली नंबर १’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते मात्र दोन्ही चित्रपट आपटले होते.
सारा लवकरच ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे.