अभिनेत्री सारा अली खान ही बॉलीवूडची लोकप्रिय स्टारकिड म्हणून ओळखली जाते. सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. आई-वडील विभक्त झाल्यानंतरही अभिनेत्रीचे तिच्या कुटुंबीयांशी फार चांगले नाते आहे.
हेही वाचा : “१०३ किलोवरून…”, सिद्धार्थ चांदेकरने पाच महिन्यांत कमी केले वजन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “शरीराविषयी आदर…”
सारा अली खान तिचा कोणताही चित्रपट रिलीज होण्याआधी मंदिरात दर्शनासाठी जात असल्याने तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या यशानंतर उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यासंदर्भात सारा अली खानने ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू स्पष्ट करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
हेही वाचा : अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’च्या ट्रेलरचं प्रेक्षक करतायत कौतुक; म्हणाले, “यावेळी ‘गदर २’ ला…”
सारा अली खान म्हणाली, “आयुष्यात मला जे योग्य वाटेल तेच मी करते. इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही. मी माझ्या मताशी सहमत असते त्यामुळे कधीच कोणताही निर्णय घेताना माझा गोंधळ होत नाही. कोणतीही गोष्ट करण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही.”
सारा पुढे म्हणाली, “मला एखाद्या गोष्टीबद्दल आवड निर्माण झाली की, ती गोष्ट मी करते. काही वर्षांपूर्वी रशियन आणि रुसो यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मी कोलंबियाला गेले होते. जर लोकांना माझ्या कामापासून त्रास होत असेल तर मी त्याच्या मतांचा नक्कीच आदर करेन कारण, मी प्रेक्षकांसाठी काम करत आहे. माझे काम त्यांना आवडतेय की नाही? हे जाणून घेणे माझी जबाबदारी आहे.”
“प्रेक्षकांना माझे काम आवडत नसेल, तर मी त्यात सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण, माझी धार्मिक श्रद्धा, मंदिरात जाणे, पोशाखाची पद्धत, विमानतळावरचा लूक किंवा व्यवस्थित सेट न केलेले केस यांपासून कोणालाही समस्या असतील तर, मी काहीच करु शकत नाही आणि या गोष्टींचा मला फरकही पडत नाही.” असे सारा अली खानने स्पष्ट केले आहे.