विकी कौशल व सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सारा व विकी व्यग्र आहेत. ते दोघेही विविध शहरांना भेटी देत आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने साराने उज्जैनच्या महाकाल मंदिरातही दर्शन घेतले, पण यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं. या ट्रोलिंगवर तिने उत्तर दिलं आहे.

२५ लाखांसाठी दोन प्रश्न अन् तीन लाइफलाइन; तरीही ‘कोण होणार करोडपती’च्या स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर?

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार अभिनेत्री म्हणाली, “प्रामाणिकपणे, मी हे आधीही सांगितले आहे आणि पुन्हा पुन्हा सांगत आहे की मी माझं काम खूप गांभीर्याने घेते. मी लोकांसाठी काम करते, त्यामुळे त्यांना काही आवडत नसेल तर मला वाईट वाटेल. पण, या माझ्या वैयक्तिक श्रद्धा आहेत. ज्या श्रद्धेने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच श्रद्धनेने मी अजमेर शरीफला जाईन. लोकांनी हवं ते बोलावं, मला काहीच त्रास नाही. माझ्यासाठी, एखाद्या ठिकाणची ऊर्जा महत्त्वाची असते. मी ऊर्जेवर विश्वास ठेवते”.

सारा अली खानला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा तिला मंदिरात जाण्यावरून ट्रोल करण्यात आलंय, तेव्हाही तिने आपण ट्रोलिंगकडे लक्ष देत नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा अली खानबरोबर अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट उद्या २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader