अभिनेत्री सारा अली खानचा चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ आजच (२१ मार्च रोजी) अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. वेगवेगळ्या भूमिका साकारत सारा प्रेक्षकांच मनोरंजन करताना दिसते. परंतु या चित्रपटात प्रेक्षकांना साराचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. सारा अनेकदा मस्करी करताना दिसते. साराच्या अशा स्वभावामुळे तिच्यामध्ये कमी गांभीर्य असावं असं कोणी मानली तर नवल नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साराने असं कबूल केलं होतं की, अनेकदा तिचं बिनधास्त वागण काही लोक गांभीर्याने घेत नाहीत. तिचा गंभीर स्वभाव ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी पाहिला गेला होता आणि याचं कारण म्हणजे ‘कॉफी विश करण’चा शो. या शोमध्ये साराचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. या शोमध्ये सारा एकदम हुशारीने, बिनधास्तपणे बोलत होती. विनोदी स्वभावाबरोबरच तिचा हा स्वभावही आता लोकांना माहित झाला आहे. पण विनोदी स्वाभावाचे तोटे आहेत. असंही सारा सांगते.

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली की, “मी विनोदी, हसऱ्या स्वभावाची असल्याने लोकांना वाटतं की माझ्यात फक्त हेच गुण आहेत. जर मी आणखी दोन कप कॉफी प्यायली तर मी तुमच्याबरोबर विनोद करू लागेन. पण याचा अर्थ असा नाही की माझ्यात सभ्यता नाही,माझ्या व्यक्तिमत्त्वात वजन नाही. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही भावना माझ्यात असू शकतात.”

हेही वाचा… ‘गुलाबी साडी…’, मराठी गाण्यावर आजीसह थिरकली अदा शर्मा; व्हिडीओ व्हायरल

सारा पुढे म्हणाली की, तिची ‘स्टार’ इमेज आणि तिचे खरे व्यक्तिमत्त्व यात कोणताही संघर्ष नाही. तिची अट फक्त एवढीच आहे की ती जशी आहे तसचं लोकांनी तिला स्वीकारावं. सारा म्हणाली, “मी अशीचं आहे, माझ्यात बालिशपणा आहे, मी विनोदी आहे परंतु माझी एक गंभीर बाजूही आहे.”

साराला गंभीर भूमिकेत पाहून लोकांना बसला धक्का

‘ऐ वतन मेरे वतन’च्या प्रोमोनंतर साराला इतक्या गंभीर भूमिकेत पाहून लोकांना थोडं आश्चर्य वाटले. सारा म्हणाली, “मला या भूमिकेत पाहून लोकांना धक्का बसला आणि त्यांना वाटलं की- ही मुलगी इथे काय करत आहे? मी विनोदी असल्याकारणाने एक भावनिक, संवेदनशील किंवा चांगली अभिनेत्री होऊ शकत नाही असं मुळीचं नाही आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे.”

हेही वाचा… तिरुपतीच्या दर्शनासाठी जान्हवी कपूर गुडघे टेकत चढली पायऱ्या; म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क…”

दरम्यान, साराचा चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ हा स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी लहान वयात ‘छोडो भारत आंदोलन’ दरम्यान भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केले होते. या चित्रपटात सारा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २१ मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan said no one takes her seriously because of her funny behaviour dvr