बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. आपल्या अभिनयाबरोबरच विनम्र स्वभावाने सारा कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. चित्रपटांव्यतरिक्त सारा आपल्या ब्लॉगसाठी जास्त चर्चेत असते. प्रेक्षकांनीही तिच्या ब्लॉगला खूप पसंत करताना दिसतात. मात्र सारा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एका फोटोवरुन नेटकरींनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. मात्र, सारांनी नेटकऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा- अनुष्काबरोबरच्या पहिल्या भेटीतच केला होता विचित्र विनोद; खुद्द विराटने सांगितला ‘तो’ किस्सा
मंदिरात जाण्यावरुन सारा ट्रोल
आपल्या सगळ्यांना माहिती आहे साराला मंदिरात जायला खूप आवडते. महादेवांची ती मोठी भक्त आहे. सारा अली खान अनेकदा मंदिरांना भेट देताना दिसते. कधी ती केदारनाथला पोहोचते तर कधी महाकालच्या दर्शनासाठी. मात्र, यासाठी तिला नेटकऱ्यांच्या द्वेषपूर्ण कमेंटचाही सामना करावा लागत आहे. नुकतीस सारा हिमाचल प्रदेशमधील बिजली महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पण साराने या नेटकऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. साराच्या म्हणण्यानुसार तिला या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही. मंदिरात जाण्यावरुनही लोक तिला काही गोष्टी ऐकवतील मात्र, याचा तिला काहीही फरक पडत नाही.
हेही वाचा- “माझ्यासमोर शाहरुख नाही टिकला, हा तर बिचारा…”; अभिनेत्याने उडवली कपिल शर्माची खिल्ली
नेटकऱ्यांना साराचे चोख प्रत्युत्तर
सारा म्हणाली, “जर प्रेक्षकांना माझ्या कामाबाबत काही तक्रार असेल तर ती माझ्यासाठीही अडचणीची ठरू शकते, कारण मी फक्त माझ्या चाहत्यांसाठी अभिनय करते. पण जर कोणाला माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल किंवा माझ्या जीवनशैलीबद्दल काही समस्या असेल तर मला काही फरक पडत नाही.”