सारा अली खान आणि विकी कौशल सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विकी-साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित असल्याने विकी कौशलला कतरिना आणि लग्नाबाबत अनेक प्रश्न ट्रेलर लॉंचिगवेळी विचारण्यात आले. चित्रपटाचे शूटींग सुरु असताना विकी- कतरिनाने लग्नगाठ बांधली होती. यावरुन सारा अली खानने सर्वांना एक मजेशीर किस्सा सांगितला. साराने सांगितलेला लग्नाबाबतचा किस्सा ऐकून ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान सगळेच हसू लागले.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Man sets himself on fire
पत्नीनं घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यास दिला नकार, पतीनं उचललं धक्कादायक पाऊल

हेही वाचा : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात काम करण्यास ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण…

सारा म्हणाली, “मी ज्या कलाकारांबरोबर काम करते त्यांच्या सगळ्यांची लगेच लग्न ठरतात. विकी माझा चौथा सहकलाकार आहे ज्याचे चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लग्न झाले. याआधी रणवीर सिंग (सिम्बा), वरुण धवन (कुली नंबर१), विक्रांत मेस्सी ( गॅसलाइट) या तिघांची लग्नसुद्धा शूटींग सुरु असताना झाली. त्यामुळे आता मी कायम सर्वांना सांगत असते, ज्यांना लग्न करायचे असेल त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करा म्हणजे लगेच तुमचे लग्न होईल.”

हेही वाचा : “फिर और क्या चाहिए…” विकी-साराने शेअर केला रोमॅंटिक व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “कतरिना तुला…”

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात कपिल (विकी कौशल) आणि सौम्या (सारा अली खान) एकत्र कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडतात. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न होते, परंतु कालांतराने संपूर्ण चित्र बदलून लग्नानंतर भांडणे वाढतात. दोघांमधील भांडण इतके वाढते की, प्रकरण कोर्टात जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचते असे चित्र ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्या एकीकडे एकांतात प्रेम करताना आणि दुसरीकडे कुटुंबासमोर भांडताना दिसत आहेत. त्यामुळे चित्रपटात नेमका काय ट्विस्ट येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader