अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी-सारा थेट राजस्थानला पोहोचले असून दोघांनी येथील सर्वात मोठ्या १७० सदस्यांच्या कुटुंबाला भेट दिली. जयपूर दौऱ्याचे अनेक फोटो या दोन्ही कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा अली खानने विकी कौशलबरोबर जयपूरच्या बाजारात साडी, चपला खरेदी करतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये विकी कौशलने साराची शायरी ऐकून तिला गमतीत ट्रोल केले आहे.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ने जमवला २०० कोटींचा गल्ला, अदा शर्माने शेअर केली खास पोस्ट म्हणाली, “चित्रपटासाठी बंगालहून आसामपर्यंत…”

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

सारा अली खान ‘नमस्ते दर्शको’ या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत असते. राजस्थानमध्ये आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना विकी-साराने जयपूरमधील साडी, चपलांच्या दुकानांना भेट दिली. जयपूरमध्ये खरेदी करताना साराने पुन्हा एकदा शायरी करीत आपल्या प्रेक्षकांना आगामी चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. साराने केलेली शायरी ऐकून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. खुद्द विकी कौशलने सुद्धा साराने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या शेवटी तिच्या शायरीची खिल्ली उडवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हेही वाचा : भारतातील लोकप्रिय अभिनेता कोण? टॉप १० च्या यादीत केवळ तीन बॉलीवूड अभिनेते, शाहरुखला मागे टाकत…

सारा अली खानची शायरी पूर्ण झाल्यावर, या व्हिडीओच्या शेवटी विकीने सर्वांचे लक्ष वेधून घेत साराला ट्रोल केले आहे. यात शेवटी विकी म्हणतो, “मला इथून पुढे तुझी शायरी ऐकायची नाहीये…” या व्हिडीओवर अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करीत “विकी भाई तू आमचे मन जिंकलेस,” “व्हिडीओ पाहताना विकीचा शेवटचा डायलॉग मिस करू नका…” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, विकी-साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी केली असून चित्रपट, २ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader