२०२२ हे वर्ष लवकरच संपणार आहे. त्यामुळे आता सर्वत्र व्हेकेशन्सचा माहोल आहे. अनेक बॉलीवूड कलाकार त्यांच्या कुटुंबीयांबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर न्यू इअर सेलिब्रेशनसाठी मुंबई बाहेर गेली आहेत तर काही जाणार आहेत. अभिनेत्री सारा अली खानही तिच्या आईबरोबर सध्या युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. यादरम्यानच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सारा नुकतीच तिच्या आईबरोबर ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी युरोपला रवाना झाली. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी सारा लंडनमध्ये जाऊन ती तिथे काय धमाल आणि मजामस्ती करतेय हे चाहत्यांशी फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून शेअर करत आहे. दरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या चांगला चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत ती लाल रंगाची डीप नेक बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये डुंबताना दिसते. हा व्हिडिओ स्लो मोशन असून ती पाण्याखालून वर येताना दिसतीये. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

तिच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असून साराच्या या हॉट लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे.