‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती तिच्या चित्रपटांच्या पोस्ट तसेच सुट्टीवर गेल्यावर तिथले क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते. साराने तिच्या नवीन वर्षाची सुरुवात भगवान शंकराच्या दर्शनाने केली आहे. तिने ‘श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग’ (आंध्र प्रदेश) या मंदिरात जाऊन घेतलेल्या दर्शनाचे फोटो शेअर केले असून तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी (२०२५) श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या भेटीचे काही फोटो शेअर केले. वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या आणि तिथून अपडेट्स शेअर करणाऱ्या साराच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा…कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ

अलीकडेच सारा अली खानच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरच्या रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी तिने आंध्र प्रदेशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पारंपरिक पांढऱ्या पोशाखात दिसत होती. तिने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले, “साराच्या वर्षाचा पहिला सोमवार, जय भोलेनाथ.”

पाहा फोटोज –

चाहत्यांनी तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, “सारासाठी खूप आदर,” तर दुसऱ्याने लिहिले, “तुझी महादेवाच्या आशीर्वादाने भरभराट होईल.” काही चाहत्यांनी तिच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने लिहिले, “स्काय फोर्ससाठी शुभेच्छा.”

sara ali khan fans commented on her post
सारा अली खानने ‘श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग’ (आंध्र प्रदेश) या मंदिरात जाऊन घेतलेल्या दर्शनाचे फोटो शेअर केले असून तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. (Photo Credit – Sara Ali Khan Instagram)

हेही वाचा…YJHD : ११ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला रणबीर-दीपिकाचा रोमँटिक चित्रपट! फक्त ३ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

सारा अली खान याआधीही अनेक ज्योतिर्लिंगांना भेट दिली आहे. तिने याआधी ‘केदारनाथ’, ‘उज्जैन’ अशा ज्योतिर्लिंगांना भेट दिली आहे. याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते. यामुळेच साराच्या या पोस्टवर तिच्या एका चाहत्याने “आणखी एक ज्योतिर्लिंग पूर्ण!!!” आणि “तुझा खूप अभिमान वाटतो.” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा…‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ नाही तर ‘या’ चित्रपटाने चीनमध्ये विकलेली ३० कोटी तिकीटे, अजूनही अबाधित आहे विक्रम

कामाच्या आघाडीवर, सारा अली खान शेवटची ‘ए वतन, मेरे वतन’ या चित्रपटात दिसली होती. तिचा आता ‘स्काय फोर्स’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे, यात तिच्यासह वीर पहारिया, अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटात आदित्य रॉय कपूरबरोबर दिसणार आहे.

Story img Loader