सारा अली खान मनोरंजनसृष्टीतील एक दिलखुलास अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या नम्र आणि निरागस स्वभावने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तिला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना ती कधीही निराश करत नाही. सगळ्यांना ती फोटो, सेल्फी देते. आता नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती चाहत्याला फोटो देताना दिसतेय. परंतु वेगळ्याच गोष्टीवरून या वहिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या प्री बर्थडे नाईटचा व्हिडीओ व्हायरल, ‘जलसा’च्या बाहेर येत बिग बींनी स्वीकारल्या चाहत्यांच्या शुभेच्छा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जिममधून निघून कारमध्ये बसून घराच्या दिशेने जाताना दिसत आहे. यादरम्यान, ती तिच्या एका चाहत्याला पाहून कार थांबवते आणि त्याच्याबरोबर फोटो काढते. मात्र, यावेळी तिचा चेहरा पाहून नेटकरी खुश झाले नाहीत. कारण नेहमी हसतमुख असणारी सारा या व्हिडीओत दुःखी आणि रडवेली वाटत आहे. तसेच या व्हिडीओत सारा अली खान डोळे पुसतानाही दिसत आहे.

सारा अली खानच्या या व्हायरल झालेल्या वहिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहले, “साराकडे पाहून असे दिसते की ती फोटो काढण्याच्या एक मिनिट आधी रडली होती.” तर दुसऱ्याने लिहिले, “नक्कीच या हसऱ्या चेहऱ्यामागे कोणीतरी मोठे दुःख लपवत आहे.” साराचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला असून चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा : अभिनेत्री सारा अली खान दिसणार देशभक्तीपर चित्रपटात, साकारणार ‘ही’ भूमिका

दरम्यान, सारा अली खान ही तिच्या आणि क्रिकेटर शुभम गिलच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली होती. ‘आतारंगी रे’ चित्रपट अपयशी ठरल्यानंतर ती आता धर्मा प्रोडक्शनच्या आगामी ‘ए वतन.. मेरे वतन’ या चित्रपटात स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे.