सारा अली खान सध्या तिच्या ‘ए वतन मेरे वतन’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच साराने झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यात तिने मराठी गाण्यांवर परफॉर्मन्सही केला होता; तसेच प्रेक्षकांबरोबर मराठीत संवाददेखील साधला होता. यादरम्यान घेतलेल्या एका मुलाखतीत साराने ‘सैराट’फेम रिंकू राजगुरूचं कौतुक केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत साराला विचारण्यात आलं होतं की, तिनं कोणता मराठी चित्रपट पाहिलाय का? त्यावर सारा म्हणाली, “मराठी चित्रपटांपैकी ‘सैराट’ चित्रपट मी पाहिला आहे आणि नुकताच तो मी पुन्हा पाहिला होता. या चित्रपटातलं रिंकूचं काम मला खूप आवडलं होतं.” या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्यानं लिहिलं, “यांना ‘सैराट’शिवाय दुसरा चित्रपटच माहीत नाही आहे.”

सारा अली खानचा हा व्हिडीओ रिंकू राजगुरूने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर केला आहे. या झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला सारा अलीखानबरोबरच बॉलीवूड स्टार शिल्पा शेट्टीनंसुद्धा उपस्थिती दर्शविली होती. या सोहळ्यात सारा अली खान काळ्या रंगाच्या गोल्डन बॉर्डर असलेल्या डिझायनर साडीमध्ये दिसली; तर शिल्पा शेट्टी पैठणी व नथ घालून मराठमोळी दिसत होती. विशेष म्हणजे तिच्या बॅकलेस ब्लाऊजनं चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. शिल्पानं तिच्या हिट गाण्यांवर डान्स करून प्रेक्षकांना मत्रमुग्धही केलं.

हेही वाचा… “माहित नाही ते कुठे आहेत”, वडिलांबद्दल सिद्धार्थ चांदेकरचं विधान; म्हणाला, “त्यांनी कधीच…”

दरम्यान, सारा अली खानच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, साराचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ २१ मार्च २०२४ रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९४२ मधील भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात मराठमोळा अभिनेता सचिन खेडेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan watched sairat and appreciated rinku rajguru at zee chitra gaurav awards dvr