हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या करून जीवन संपवले. त्याचे निधन होऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बराच गोंधळ उडाला होता. तीन वर्षानंतरही सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा अद्याप खुलासा झाला नाही. अभिनेत्री सारा अली खानने सुशांतच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. सारा आणि सुशांतने केदारनाथ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो जे साराची डेब्यू फिल्म ‘केदारनाथ’च्या शूटिंगदरम्यानचे आहेत. एका फोटोमध्ये सारा आणि सुशांत हेलिकॉप्टरमध्ये बसून मागे वळून हसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही निसर्गाच्या सान्निध्यात बसून त्यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

साराने फोटो शेअर करताना एक भावनिक कॅप्शनही दिलं आहे. साराने लिहिलं, “केदारनाथच्या आमच्या पहिल्या ट्रिपवर… आमच्या पहिल्या शूटच्या मार्गावर. मला माहीत आहे की मला पुन्हा असे कधीच वाटणार नाही. पण मला माहीत आहे की तू ॲक्शन, कट, सनराइज, नदी, चंद्र रात्र, केदारनाथ आणि अल्लाच्या मध्ये होतास. तू नेहमी ताऱ्यांमध्ये चमकत राहा. केदारनाथ ते एंड्रोमेडा (जवळच्या आकाशगंगेचे नाव) पर्यंत.”

सुशांत सिंह राजपूतच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने अभिनेत्याच्या आठवणीत खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिया दिवंगत अभिनेत्याला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रियाने हार्ट इमोजी आणि इन्फिनिटीचे चिन्ह दिले आहे. मात्र, रियाने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला नाही. नेटकऱ्यांनी रियाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, सुशांतने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘काय पो छे’, ‘छिछोरे’, ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांत काम करून त्याने बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते.

Story img Loader