हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता त्यांचे शेवटचे ट्वीट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतीश कौशिक हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायचे. सतीश कौशिक यांनी त्यांच्या शेवटच्या ट्वीटमध्ये चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी शुभेच्छा देत म्हटलं होतं, “रंग आणि आनंदाची उधळण करणारा सण. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. जावेद अख्तर यांची जुहू येथील होळी पार्टी. अली फझल आणि रिचा चड्ढा या नवविवाहित जोडप्याचीही भेट झाली.”

सतीश कौशिक यांनी या होळी पार्टीचे अनेक फोटोही शेअर केले होते. त्यात ते मजा-मस्ती करतानाही दिसत आहेत.

दरम्यान सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा जी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish kaushik death last social media post wishes holi nrp
Show comments