Satish Kaushik Death: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ६६व्या वर्षीही कौशिक त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देताना दिसायचे. फिट राहण्यासाठी ते नियमितपणे व्यायाम करायचे. सतीश कौशिक सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असायचे. व्यायाम करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करुन ते चाहत्यांना याचं महत्त्व पटवून देताना दिसायचे. निधनानंतर कौशिक यांचा जीममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा>> निधनाच्या एक दिवस आधीच सतीश कौशिक खेळलेले होळी, गावी गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला अन्…
‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन सतीश कौशिक यांचा जीममधील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कौशिक व्यायाम करताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते हळहळले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहेत.
सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.