सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतीश यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय कोलमडून गेले आहेत. शिवाय त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसला. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. याच पार्टीमधील सतीश यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सतीश यांच्या निधनानंतर विकास मालूचं नाव सतत चर्चेत येत आहे. विकासच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सतीश यांची हत्या विकासने केली असल्याची तक्रार व्यावसायिकाच्या पत्नीने पोलिसांमध्ये दाखल केली. पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर विकासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सतीश यांचा होळी पार्टीदरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

पाहा व्हिडीओ

विकासने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सतीश भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी पांढरा सदरा व कुर्ता परिधान केला असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. सतीश यांनी ही होळी पार्टी मनसोक्त एण्जॉय केली. या पार्टीनंतरच त्यांना अस्वस्थता जाणवू लागली. पण या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं.

आणखी वाचा – ३८ वर्षांचा संसार, १० वर्षांची मुलगी अन्…; सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अशी झाली आहे पत्नीची अवस्था

विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे सतीश यांना १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते. या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याची तक्रार व्यावसायिकेच्या पत्नीने पोलिसांमध्ये दाखल केली. यावर विकासने सतीश यांचा पार्टीदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत या सगळ्या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish kaushik passed away at the age of 66 actor holi party video from delhi he dance like madly video goes viral on social media see details kmd