Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीमध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान सतीश यांची प्राणज्योत माळवली. सतिश यांच्या निधनाचं वृत्त कळताच मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाकार मंडळी दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच त्यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सतीश यांच्या घरातील एका सदस्याचा विवाहसोहळा होता. दरम्यान या विवाहसोहळ्यासाठी ते जोधपूरला गेले होते. या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

या लग्नाच्या संगीत सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याने अनेक सुपरहिट गाणी गायली. यादरम्यानचा व्हिडीओ सतिश यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. तसेच सोनू निगमचं कौतुकही केलं. या व्हिडीओमध्ये ते सोनू निगमसह गाणं गाताना दिसत आहेत. “आजा आजा मैं हूँ प्यार तेरा” हे गाणं ते गाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

आणखी वाचा – दोन वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर सतीश कौशिक यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर, ५६ व्या वर्षी पुन्हा वडील झाले अन्…

सतीश यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. तर कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे.

Story img Loader