बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९ मार्च रोजी (गुरुवारी) निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. मुलगी वंशिका ही १० वर्षांची आहे. तर सतीश यांची पत्नी शशी कौशिक यांचीही अवस्था बिकट झाली आहे.

आणखी वाचा – सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच रुग्णालयामध्ये जात होते पण…

Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
13 yr old sadhvi in mahakumbh
महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?

सतीश यांच्या कुटुंबियांची नेमकी स्थिती काय आहे? याबाबत अभिनेत्री डेलनाज ईराणीने भाष्य केलं आहे. ‘न्यूज १८ हिंदी’बरोबर संवाद साधताना डेलनाजने संपूर्ण माहिती दिली. ती कौशिक कुटुंबियांच्या अगदी जवळ आहे. सतीश यांच्या निधनाची बातमी ऐकताच डेलनाजलाही मोठा दुःखद धक्का बसला होता.

डेलनाज म्हणाली, “९ मार्चला (गुरुवारी) सकाळी मी सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांना फोन केला होता. तेव्हा त्यांचं रडणं थांबतच नव्हतं. शशी बोलण्याच्या मनस्थितीमध्येही नव्हत्या”. डेलनाज शशी कौशिक व सतीश यांची मुलगी वंशिकाच्या फार जवळ आहे. कौशिक कुटुंबियांबरोबर तिचं चांगलं नातं आहे.

आणखी वाचा – Video : १० वर्षांच्या लेकीसह सतीश कौशिक यांचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

सतीश कौशिक यांनी १९८५ मध्ये शशी कौशिक यांच्याशी विवाह केला. १९९६ मध्ये दोन वर्षाच्या मुलाला गमावल्यानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने त्यांना मुलगी झाली. त्यांची मुलगी वंशिका आता १० वर्षांची आहे. सतीश यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगी अधिकाधिक ताकद मिळो अशी प्रार्थना कलाकारांसह चाहतेमंडळी करत आहेत.

Story img Loader