Satish Kaushik Passed Away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच कलाकारांसह चाहते मंडळीही हळहळ व्यक्त करत आहेत. सतीश यांची पत्नी शशी कौशिक या नेमक्या कोण आहेत? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच रुग्णालयामध्ये जात होते पण…

१९८५मध्ये सतीश व शशी यांचं लग्न झालं. ३८वर्षे या दोघांनी अगदी सुखाने संसार केला. शशी या सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. पण कलाक्षेत्राशी शशी यांचा संबंध आहे. त्या एक निर्मात्या आहेत. ‘छोरियां छोरों से कम नहीं होती’ या चित्रपटाची निर्मिती शशी यांनी केली. या चित्रपटामध्ये सतीश यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

त्याचबरोबरीने पंकज त्रिपाठीच्या ‘कागज’ चित्रपटाच्या त्या सहनिर्मात्या होत्या. त्यांना कलाक्षेत्राची आवड आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर सतीश व शशी यांना मुलगा झाला. त्याचं नाव शानू होतं. पण सतीश यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं होतं. छोट्या मुलाच्या निधनामुळे कौशिक यांना मोठा धक्का बसला होता.

आणखी वाचा – Video : १० वर्षांच्या लेकीसह सतीश कौशिक यांचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

१६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना मुलगी झाली. वयाच्या ५६व्या वर्षी सतीश पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे. ती आता १० वर्षांची आहे. सतीश त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मुलगी व पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करायचे. सतीश यांच्या निधनानंतर त्यांचा मुलीबरोबर डान्स करतानाचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish kaushik passed away at the age of 66 know about actor wife shashi kaushik who is producer see details kmd