Satish Kaushik Passed Away: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी एक दिवस आधीच सतीश कौशिक यांनी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह होळी सेलिब्रेट केली होती. जावेद अख्तर यांच्या होळी पार्टीमध्ये ते सहभागी झाले होते. बॉलिवूड कलाकारांबरोबर रंगांची उधळण केल्यानंतर कुटुंबियांबरोबर होळी साजरी करण्यासाठी कौशिक दिल्लीला गेले होते. दिल्लीत आल्यानंतर सतिश कौशिक एका व्यावसायिकाच्या हार्महाऊसवर आयोजित केलेल्या होळी पार्टीत सहभागी झाले होते. हार्महाऊसवर असतानाचा रात्री त्यांती प्रकृती बिघडली होती. रात्री ११:३० वाजता कौशिक यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर लगेचच त्यांना दिल्लीतील फॉर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा>>Video: ६६व्या वर्षीही नियमित व्यायाम करायचे सतीश कौशिक, निधनानंतर जीममधील व्हिडीओ व्हायरल

हेही पाहा>>Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

सतिश कौशिक ८ मार्चला दिल्लीत आले होते. फार्महाऊसवरच त्यांची तब्येत बिघडल्याने तिथे नेमकं काय घडलं होतं? याचा तपास पोलीस करत आहेत. कौशिक यांना रुग्णालयात घेऊन गेलेल्या व्यक्तींच्या संपर्कातही पोलीस आहेत. त्यांची चौकशीही पोलिसांकडून केली जाणार आहे. कौशिक यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सतीश कौशिक यांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने याबाबत पोलिसांना कळवले.

हेही वाचा>>दोन वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर सतीश कौशिक यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर, ५६ व्या वर्षी पुन्हा वडील झाले अन्…

सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.