Satish Kaushik Passed Away: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

सतीश कौशिक यांनी निधनाच्या एक दिवस आधीच होळी साजरी केली होती. बॉलिवूड सेलिब्रिटींसह त्यांनी होळीच्या पार्टीत रंगांची उधळण केली होती. त्यानंतर ८ मार्चला कुटुंबीयांसह होळी साजरी करण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. दिल्लीतील एका मित्राच्या फार्महाऊसवर होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत ते सहभागी झाले होते. कौशिक यांच्या होळी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कौशिक मनसोक्त होळी साजरी करताना दिसत आहेत. कौशिक यांचा हा व्हिडीओ शेवटचा ठरला आहे.

vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant dance on Afghan Jalebi song in bathroom video viral
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा बाथरुममध्ये ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हेही वाचा>> सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्तांना लग्नाची मागणी घातल्यानंतर ‘अशी’ होती त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया, स्वतःच केलेला खुलासा

हेही पाहा>>Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी कौशिक यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा>>Satish Kaushik Passed Away: सतीश कौशिक यांच्या निधनाचं कारण समोर, शवविच्छेदन अहवालातून मिळाली माहिती

सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.