Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1: कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट गुरुवारी (२९ जून रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर, समीक्षकानींही चित्रपट एंटरटेनिंग असल्याचं म्हटलं होतं. अशातच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनची जोडी ‘भूल भुलैया २’मध्ये दिसली होती. यामध्ये त्यांच्या जोडी प्रेक्षकांना फार आवडली होती. चित्रपटानेही खूप चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर आता ‘सत्यप्रेम की कथा’मधून ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. पण या चित्रपटाला ‘भूल भुलैया २’ सारखा प्रतिसाद मिळाला नाहीये. तसेच चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाईही त्या तुलनेत कमी आहे.
‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सत्यप्रेम की कथा’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अंदाजे ९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट बकरी ईदच्या सुट्टीच्या दिवशी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. मात्र, या सुट्टीचा चित्रपटाला फारसा फायदा झालेला नाही. पण, वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे.
रोमँटिक प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे.