Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 3: कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली चांगली कमाई करत आहे. शुक्रवारी कमाईत घट झाल्यानंतर शनिवारी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.

‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये काजोलबरोबरचे बोल्ड सीन पाहून पत्नीची प्रतिक्रिया काय होती? कुमुद मिश्रा म्हणाले, “मला तिच्या…”

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”

रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली, शुक्रवारी चित्रपटाने फक्त ७ कोटी कमावले. पण, शनिवारी मात्र ६८ टक्के वाढीसह चित्रपटाने ११.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. याबरोबरच चित्रपटाने एकूण २८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

शनिवारी कलेक्शनमध्ये झालेली वाढ पाहता रविवारीही चित्रपट दमदार कमाई करेल, अशी शक्यता आहे. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन ही जोडी ‘भूल भुलैया २’ नंतर ‘सत्यप्रेम की कथा’मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. पण या चित्रपटाला ‘भूल भुलैया २’ सारखा प्रतिसाद मिळाला नाहीये. तुलनेने प्रतिसाद कमी असला तरी चित्रपट चांगली कमाई करत आहे.

रोमँटिक प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader