‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २९ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिवसेंदिवस त्याच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यन व कियारा अडवाणीच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी चांगली कामगिरी केली. चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे.

‘सत्यप्रेम की कथा’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; कार्तिक-कियाराच्या चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने ९.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत घट नोंदवण्यात आली होती, शुक्रवारी चित्रपटाने फक्त ७ कोटी कमावले. शनिवारी मात्र ६८ टक्के वाढीसह चित्रपटाने १० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर आता चौथ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी रुपये कमावले. चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफीस कलेक्शन ३८ कोटींहून अधिक झालं आहे.

‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये काजोलबरोबरचे बोल्ड सीन पाहून पत्नीची प्रतिक्रिया काय होती? कुमुद मिश्रा म्हणाले, “मला तिच्या…”

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपट अशीच दमदार कमाई करत राहिला तर तो ‘भूल भुलैया २’ नंतर कार्तिक-कियारा यांचा हा दुसरा हिट चित्रपट असेल. याआधी कार्तिकचा ‘शेहजादा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे. चित्रपटात कार्तिक-कियाराशिवाय सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत व शिखा तलसानिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader