सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधल्यावर अभिनेत्री कियारा अडवाणी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. यामध्ये कियारा कार्तिक आर्यनसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यापूर्वी कियारा आणि कार्तिकने ‘भूल भुलय्या’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, २९ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटासाठी कार्तिक-कियारा लवकरच एक गाणे शूट करून या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते कार्तिक-कियाराच्या डान्सने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. गाण्याचे शूटिंग मुंबईतील एका समुद्रकिनाऱ्यावर होणार असून १० दिवसांपूर्वी या गाण्यासाठी भव्य सेट तयार करण्यात आला आहे. यासाठी निर्मात्यांनी बंगलासुद्धा बुक केला आहे. आठवडाभर हे संपूर्ण गाणे चित्रित केले जाईल आणि त्यानंतर या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिस या गाण्याला कोरिओग्राफ करणार आहेत.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; १७ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या एकूण कमाई

‘सत्यप्रेम की कथा’या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.‘भूल भुलय्या’च्या यशानंतर ही ऑनस्क्रीन जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’चा टीझर पाहिल्यावर कार्तिक-कियाराच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून पसंती मिळत असून त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : ‘आर्या’ वेब सीरिजसाठी सुष्मिता सेन नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीने नकार दिला म्हणून…

‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट या वर्षी २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण काही कारणास्तव यात बदल करून ‘सत्यप्रेम की कथा’ असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader