ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या वेब सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सीरिजमधील अभिनेत्री सयानी गुप्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. त्यानंतर सयानीची ‘काली-पीली टेल्स’ वेब सीरिज प्रदर्शित झाली व तिलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड भूमिका अगदी लीलया साकारणारी अभिनेत्री म्हणून सयानी चांगलीच लोकप्रिय आहे.

नुकतीच ती कपिल शर्माच्या ‘zwigato’ या चित्रपटात झळकली होती. आता मात्र ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आपल्या विमानप्रवासादरम्यानचा अनुभव तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केला आहे, इतकंच नव्हे तर या पोस्टमध्ये तिने भारतातील सरसकट सगळ्याच पुरुषांबद्दल टिप्पणी केली आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”

आणखी वाचा : एका हातात हातोडा, दुसऱ्या हातात AK-47 अन्…मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘रामबाण’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

आपल्या या स्टोरीमध्ये सयानी लिहिते, “विमानप्रवासादरम्यान प्रत्येक भारतीय पुरुषाचं वर्तन हे फारच असभ्य असतं. मोठमोठ्याने फोनवर बोलणे, खोकणे, शिंकणे हे फारच असभ्य वर्तन आहे. एका व्यक्तीच्या बॅगेचा फटका माझ्या चेहेऱ्यावर बसला अन् त्याला त्याची साधी जाणीवसुद्धा नव्हती. सगळे माझ्याकडेच पहात होते. माझी ही पोस्ट आत्ता जे वाचतायत तुमच्यापैकी बरेच लोक हे या प्रकारात मोडतात.” सयानीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.

sayanigupta
फोटो : सोशल मीडिया

नेटकऱ्यांनी तिला यावर प्रतिक्रिया द्यायला सुरू केलं आहे. काहींनी सयानीच्या पोस्टवर सहमती दर्शवली तर काहींनी तिच्या इतर पोस्टवर कॉमेंट करत महिलांचं वर्तन कसं असतं असा खोचक उलट प्रश्न विचारला आहे. सयानी वेबसीरिजबरोबरच ‘मार्गारेट विथ अ स्ट्रॉ’, ‘पार्च्ड’, ‘फॅन’, ‘आर्टिकल १५’, ‘जॉली एलएलबी २’सारख्या चित्रपटातही काम केलं आहे. वेब विश्वातील ‘इन्साइड एज’ व ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या दोन सीरिजमुळे सयानीला खरी ओळख मिळाली.

Story img Loader