SCREEN Magazine Launching Event:’द इंडियन एक्स्प्रेस’चे स्क्रीन मॅगझिन पुन्हा एकदा लाँच होणार आहे. हे मॅगझिन ११ वर्षांनी पुन्हा डिजिटली लाँच होत आहे. शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत त्याचा भव्य लाँचिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘स्त्री २’ फेम श्रद्धा कपूर पहिल्या डिजिटल कव्हरचा भाग असेल. तिच्या हस्तेच ‘स्क्रीन’ लाँच होणार आहे.

‘स्क्रीन’ मॅगझिनच्या लाँचिंगनंतर श्रद्धा कपूरची मुलाखत होईल. यात ती तिचे आयुष्य, करिअर स्टारडम याबद्दल बोलताना दिसेल. तसेच हा इव्हेंट आणखी दोन सेलिब्रिटींमुळे खास होणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी व विजय वर्मा यांचे पॅनल डिस्कशन ठेवण्यात आले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ च्या एंटरटेनमेंट एडिटर ज्योती शर्मा बावा या दोघांशी संवाद साधणार आहेत.

‘लाइव्ह स्क्रीन’चा स्पेशल सेगमेंट ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका होस्ट करणार आहेत. हे सेशन श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांनी संपेल. ‘स्क्रीन’ लाँच झाल्यानंतर ‘क्रिएटर एक्स क्रिएटर’ हे सेशन असेल. यामध्ये विजय वर्मा व ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘३ इडियट्स’ आणि शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी गप्पा मारतील.