SCREEN Magazine Launching Event Live : ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या Screen मॅगझिनचं पुन्हा एकदा अनावरण करण्यात आलं आहे. हे मॅगझिन ११ वर्षांनी पुन्हा डिजिटली लाँच करण्यात आलं. शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत त्याचा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘स्त्री २’ फेम श्रद्धा कपूर पहिल्या डिजिटल कव्हरचा भाग असून तिच्या हस्तेच ‘स्क्रीन’ मॅगझिनचं अनावरण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्क्रीन’ मॅगझिनच्या लाँचिंगनंतर श्रद्धा कपूरच्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे. यात ती तिचे आयुष्य, करिअर, स्टारडम याबद्दल बोलताना पाहायला मिळेल. तसेच हा इव्हेंट आणखी दोन सेलिब्रिटींमुळे खास होत आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी व विजय वर्मा यांचं या सोहळ्यादरम्यान पॅनल डिस्कशन ठेवलं आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एंटरटेनमेंट एडिटर ज्योती शर्मा बावा आता श्रद्धाशी संवाद साधत आहेत.

‘लाइव्ह स्क्रीन’चा स्पेशल सेगमेंट ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत गोयंका होस्ट करत आहेत. हे सेशन श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांनी संपेल. ‘स्क्रीन’ लाँच झाल्यानंतर ‘क्रिएटर एक्स क्रिएटर’ हे सेशन असेल. यामध्ये विजय वर्मा व ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘३ इडियट्स’ आणि शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी गप्पा मारतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Screen magazine to be unveiled by shraddha kapoor in mumbai the indian express hrc