चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जावेद खान अमरोही यांचं मुंबईत निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांचं वय ५० वर्ष एवढं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर गेले काही दिवस ते उपाचर घेत होते. केवळ चित्रपटच नव्हे तर टेलिव्हिजन क्षेत्रातही जावेद यांचं भरपूर मोठं योगदान आहे. जावेद यांच्या निधनामुळे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्याच्या एका जवळच्या व्यक्तीने या बातमीची खातरजमा केली आहे. तसेच त्या व्यक्तीने ‘टाईम्स नाऊ’ या माध्यमाशी संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जावेद खान यांना श्वसनाचा त्रास होता. गेले वर्षभर ते अंथरूणाला खिळूनच होते. सांताक्रूझच्या सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्ही फुफ्फुसं निकामी झाली होती. आजच ओशिवारा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

आणखी वाचा : पाकिस्तानी टेलिव्हिजन मालिकांचं विवेक अग्निहोत्रींनी केलं कौतुक; म्हणाले “त्यांच्यासारखं नाट्य…”

प्रसिद्ध अभिनेते आणि त्यांचे सहकलाकार अखिलेन्द्र मिश्रा यांनीही त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. “जावेद खान साहेब यांना विनम्र श्रद्धांजली, एक उत्कृष्ट अभिनेता, वरिष्ठ रंगकर्मी इप्टाचे सक्रिय सदस्य” अशी पोस्ट शेअर करत अखिलेन्द्र यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जावेद खान यांनी तब्बल १५० चित्रपटात काम केलं आहे. ‘कुली नंबर १’, ‘लगान’, ‘चक दे इंडिया’, ‘अंदाज अपना अपना’सारख्या कित्येक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आज त्यांच्या जाण्यामुळे मनोरंजनसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.

Story img Loader