ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखल्या जातात. रोहिण हट्टंगडी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात आपले कौशल्य दाखवले आहे. त्यांची अग्निपथ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका विशेष गाजली होती. हट्टंगडी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये मोठी तुलना केली आहे. इतकंच नाही तर ती तुलना करताना रणवीर सिंगचं सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये वागणं मला योग्य वाटत नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “तुम्ही मला इथे स्पर्श…”; शाहरुख खानबरोबर किसिंग सीन करण्यास पाकिस्तानी अभिनेत्रीने दिला होता नकार

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी हट्ट्ंगडी म्हणाल्या,”रणवीर सिंग चांगलाच आहे पण मला रणबीर कपूर थोडा जास्त आवडतो. रणवीर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये असताना वागतो ते आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं योग्य असेलही पण आमच्या जनरेशनसाठी नाही. रोहिणी यांच्या मते तुम्ही पब्लिक फिगर असाल तर तुम्ही लोकांमध्ये वागताना खूप विचारपूर्वक वागायला हवं,जे रणवीर वागत नाही’.

रोहिणी हट्टंगडी यांना एकेकाळी फक्त आईच्या भूमिकाच ऑफर व्हायच्या. ‘अग्निपथ’ सिनेमा करण्याआधी रोहिणी हट्टंगडी यांनी ठरवून टाकलं होतं की त्या आईच्या भूमिका कधीच करणार नाहीत. त्यांनी जवळपास तीन ते चार सिनेमांना त्यामुळे नकार दिला होता. त्यांच्या सेक्रेटरीनं शेवटी त्यांना असा नकार देण्यापासून थांबवण्याचा प्रयत्नही केला. पण अभिनेत्रीनं मनाशी पक्क ठरवलं होतं मी खलनायिका साकारेन पण आईच्या भूमिका करणार नाही.
अग्निपथ चित्रपटातील भूमिकेबाबतही रोहिणी हट्टंगडींनी खुलासा केला आहे. म्हणाल्या, जेव्हा मला ‘अग्निपथ’ ऑफर झाला तेव्हा मी आधीच ठरवलं होतं की मी आधी सिनेमाची स्क्रीप्ट ऐकणार आणि मग ठरवणार सिनेमा करायचा की नाही.

हेही वाचा- “सैफ आणि करीनाच्या नात्यामुळे मला…” नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत अमृता सिंहची अशी होती प्रतिक्रिया, म्हणालेली “आमच्या मुलांना..

‘अग्निपथ’मध्ये आईची भूमिका करण्यास रोहिणी हट्टंगडी का तयार झाल्या याविषयी सांगताना म्हणाल्या,”स्टोरी नरेशन सुरु असताना जवळपास अर्धी स्टोरी ऐकल्यावर मी ‘अग्निपथ’मध्ये आईची भूमिका करण्यास होकार दिला. अमिताभच्या सिनेमात नेहमी हिरोईन,व्हिलन,हिरो म्हत्त्वाचे असायचे पण ‘अग्निपथ’मध्ये छोट्यातलं छोटं कॅरेक्टर तितक्याच ताकदीनं दाखवलं जाणार होतं”.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior actress rohini hattangadi says ranveer singh does not behave properly in public place likes ranbir kapoor dpj