बरेच सेलिब्रिटी थायलंड, मालदीवला फिरायला जात असतात; पण एक ज्येष्ठ अभिनेत्री बँकॉकला शॉपिंग करायला गेली होती. तिथेच अपघात झाला आणि ट्रिप महागात पडली असं त्या अभिनेत्रीने म्हटलं आहे. या अभिनेत्रीचं नाव अरुणा इराणी. अरुणा यांचा नुकताच बँकॉकमध्ये अपघात झाला. आता त्या मुंबईला परत आल्या असून अपघातातून बऱ्या होत आहेत. ७९ वर्षांच्या अरुणा इराणी यांनी स्वतः त्यांच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे. अपघात कसा झाला तेही त्यांनी सांगितलं आहे.

अरुणा इराणी बँकॉकला शॉपिंग ट्रिपवर गेल्या होत्या आणि तिथे गेल्यावर दोन दिवसांनी त्यांचा अपघात झाला. रस्त्याने चालत असताना त्यांचा अपघात झाला, मात्र त्वरित वैद्यकीय मदत मिळाली, असं त्यांनी सांगितलं.

ट्रिप एंजॉय करताना अपघात झाला, असं अरुणा इराणी (Aruna Irani accident in Bangkok) इ-टाइम्सशी बोलताना म्हणाल्या. अपघातानंतर त्या खाली पडल्या, तिथे त्यांना लगेच वैद्यकीय उपचार मिळाले आणि दोन आठवड्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्या मुंबईला परत आल्या. पण, परत येताच त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले. पण आता त्यातूनही बरं झाल्यासं इराणींनी सांगितलं.

अरुणा म्हणाल्या की त्या बँकॉकला कामासाठी नाही तर फक्त खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. ही ट्रिप खूप महागात पडल्याचं त्यांनी हसत सांगितलं. “ट्रिप एवढी एंजॉय केल्यावर हे होणारच होतं,” असं त्या गमतीत म्हणत हसू लागल्या.

अरुणा इराणी १९६० च्या दशकात चित्रपटांमध्ये आल्या आणि १९९० पर्यंत, म्हणजे जवळपास ३० वर्षे त्या सातत्याने सहाय्यक भूमिकांमध्ये दिसल्या. ‘बॉबी’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘कारवां’, ‘राजा बाबू’, ‘बेटा’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्या शेवटच्या २०२४ मध्ये आलेल्या ‘घुडचढी’ या चित्रपटात झळकल्या होत्या. यामध्ये रवीना टंडन आणि संजय दत्त यांच्याही भूमिका होत्या.

Story img Loader