सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML)च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर अनेक जण या चित्रपटाला ‘प्रोपगंडा चित्रपट’ म्हणत आहेत. आता या चित्रपटातील १० दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे.

‘द केरळ स्टोरी’ला सेन्सॉर बोर्डाने A प्रमाणपत्र दिले आहे. पण याबरोबरच या चित्रपटातील काही सीन्स कट करण्यात आले आहेत. या चित्रपटातून वागळल्या गेलेल्या दृश्यांमध्ये केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचाही एक सीन आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन यांची ही मुलाखत होती, असे सांगितले जात आहे.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

आणखी वाचा : Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

वादग्रस्त ठरू शकतील अशा सीन्सना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. ‘हिंदू देवतांबद्दल चुकीचे संदर्भ आणि अयोग्य संवाद’ असलेली दृश्ये सेन्सॉर बोर्डाने हटविण्यास सांगितली आहेत आहे. तर अनेक संवाददेखील बदलण्यास सांगितले आहेत. याशिवाय, चित्रपटात एक संवाद आहे, ज्यामध्ये ‘भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत,’ असे म्हटले आहे. त्यातून ‘भारतीय’ हा शब्द काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे. या चित्रपटात केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांची टीव्ही मुलाखत दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की, “केरळ पुढील दोन दशकांत मुस्लीमबहुल राज्य होईल, कारण राज्यातील तरुणांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रभावित केले जात आहे.” सेन्सॉर बोर्डाने ही संपूर्ण टीव्ही मुलाखत चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा : “हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या…,” ‘द केरळ स्टोरी’ला प्रोपगंडा चित्रपट म्हणणाऱ्यांना अदा शर्माचे सडेतोड उत्तर

चित्रपटाची कथा काही महिलांची आहे, ज्यांना धर्मांतराद्वारे मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले. केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असून, त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अदा शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

Story img Loader