इमरान हाश्मी हा नुकत्याच आलेल्या ‘टायगर ३’ चित्रपटापासून चांगलाच चर्चेत आहे. सध्या त्याच्या पोतडीत अनेक चित्रपट आहेत. तो लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे. याचदरम्यान आणखी एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. इमरान हाश्मीच्या १९ वर्ष जुन्या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘आशिक बनाया आपने’. पण यात इमरान हाश्मी या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार नाही असं ही स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या ‘आशिक बनाया आपने २’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. २००५ साली याचा पहिला भाग आला होता ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, याबरोबरच इमरान हाश्मीला ‘सिरियल किसर’ हा किताबही याच चित्रपटामुळे मिळाला. या चित्रपटात इमरान हाश्मी, सोनू सूद आणि तनुश्री दत्ता हे तिघे प्रमुख भूमिकेत होते. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याने या दुसऱ्या भागात नेमके कोणते कलाकार पाहायला मिळणार याबद्दल चर्चा होत आहे.

आणखी वाचा : सुश्मिता सेन ‘मिस युनिव्हर्स’ व्हावी यासाठी तिच्या बॉयफ्रेंडने सोडलेलं नोकरीवर पाणी; नेमका किस्सा जाणून घ्या

मीडिया रीपोर्टनुसार ‘आशिक बनाया २’ची लवकरच घोषणा करण्यात येणार असून खुद्द इमरान हाश्मीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. तर मग इमरान ऐवजी या सीक्वलमध्ये अभिनेता सनी सिंग दिसणार अशी चर्चाही होताना दिसत आहे. एका मीडिया पोर्टलच्या माहितीनुसार लवकरच चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असून तब्बल ४० दिवस याचं चित्रीकरण चालणार आहे.

पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य दत्तच या सीक्वलचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे तर या चित्रपटाच्या संगीताची जवाबदारी हिमेश रेशमिया यांच्याकडेच असल्याचं स्पष्ट होत आहे. अद्याप या चित्रपटाविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही. या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारा सनी सिंग हा याआधी ‘प्यार का पंचनामा २’, ‘आदिपुरुष’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारख्या चित्रपटात झळकला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sequel of emraan hashmi starrer aashiq banaya aapne is in making avn