आपल्या आवाजाने चाहत्यांची मनं जिंकणारा गायक शान त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शानने टोपी घातलेले आणि नमाज पठण करतानाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर गायकाला खूप ट्रोल करण्यात आले. आता शानने या प्रकरणावर ट्रोलर्सना सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – लग्नाच्या सहा वर्षांनी पतीपासून विभक्त झाली ‘तांडव’ फेम अभिनेत्री; ४ वर्षांनंतर खुलासा करत म्हणाली, “पीडितेसारखं…”

ईदच्या निमित्ताने गायक शानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो डोक्यावर पांढरी टोपी घालून नमाज पठण करताना दिसत होता. शानचा हा फोटो जुना असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये शानने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्याने ही पोस्ट करताच शान सोशल मीडियावर खूप ट्रोल होऊ लागला. वाढतं ट्रोलिंग पाहून शान त्यादिवशी इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला व त्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – वर्षभरात मोडलेलं पॉर्नस्टार मिया खलिफाचं दुसरं लग्न, ‘या’ कारणाने पती रॉबर्टला दिलेला घटस्फोट

“मी कोणालाही स्पष्टीकरण देत नाहीये. मी फक्त माझ्याबद्दल बोलत आहे. सर्व सण साजरे केले पाहिजेत हीच आपल्या भारताची ओळख आहे. तसेच प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे, अशी शिकवण आपल्याला देण्यात येते. एकमेकांशी प्रेमाने वागावे, कोणाविषयी गैरसमज पसरवू नये, त्यामुळे फक्त नुकसानच होते बाकी काही नाही,” असं शान म्हणाला.

शान पुढे म्हणाला, “लोकांनी अशा कमेंट्सही केल्या की हिंदू असताना हे सगळं करण्याची काय गरज होती. मला आठवतंय काही महिन्यांपूर्वी मी सुवर्ण मंदिरात गेलो होतो. तिथेही डोकं झाकावं लागतं आणि मीही तसंच केलं, पण त्यावेळी अशा प्रतिक्रिया आल्या नाहीत. हिंदू असूनही तू शिखासारखं का केलंस, तू अशी पोज का दिलीस, असा लूक का केलास, असं कोणीही म्हटलं नाही.”

“प्रत्येक धर्माचा आदर करणे हे एखाद्या व्यक्तीच्या विचारसरणीवर अवलंबून असते. आज आपण पुरोगामी भारतात जगत आहोत. आपण प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे, कोणत्याही धर्माचा लूक घेतल्याने आपण कोणाच्या विरोधात जात नाही, तर ती त्यांची उत्सवाची पद्धत आहे. मी कोणता सण कसा साजरा करायचा, हे माझ्या विचारांवर अवलंबून आहे, ते मी बदलू शकत नाही,” असंही शानने म्हटलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaan slams trollers for bad comments on his muslim look post hrc