ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. कालच म्हणजेच १३ एप्रिल रोजी सतीश कौशिक याचा वाढदिवस. निधनानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांचा वाढदिवस आला आहे, अशातच चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कित्येक आठवणींना उजाळा देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते अनुपम खेर यांनीची त्यांच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीदेखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सतीश कौशिक यांच्याबद्दलचा त्यांनी एक खास किस्साही सांगितला आहे. एक चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक आत्महत्या करायला निघाले असल्याचं शबाना यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : प्रतीक्षा संपली! रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख पक्की; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार?

अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्यासाठी आयोजित केलेल्या खास संगीत कार्यक्रमात शबाना यांनी हा किस्सा सांगितला. ‘रूप की रानी चोरों का राजा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर सतीश कौशिक यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. याविषयी शबाना म्हणाल्या, “चित्रपट फ्लॉप झाल्याने ते खूपच अस्वस्थ होते, त्यावेळीच त्यांच्या मनात मरणाचे विचार यायला लागले होते, “आता मला मरायला हवं” असं त्यांनी म्हंटलं आणि आत्महत्येसाठी मार्ग शोधत असताना त्यांनी पहिल्या मजल्यावरून खाली वाकुन पाहिलं. तेव्हा तिथे एक पार्टी सुरू होती आणि त्यात बटाटे आणि वांगी तळताना सतीश यांनी पाहिलं, तेव्हा ते पाहून सतीश म्हणाले, की या वांगी आणि बटाट्यामध्ये जर मी जीव दिला तर तो फारच वाईट मृत्यू असेल.”

आणखी वाचा : Video: दिवंगत सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी शेअर केले Unseen Photos; म्हणाले,”शशी आणि वंशिका…”

शबाना आझमी यांनी सांगितलेली ही आठवण ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात हसता हसता पाणी आले. अनुपम खेर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उदित नारायण, साधना सरगम, पॅपोन, राणी मुखर्जी, सुभाष घई यांच्यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली आणि सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi explains why satish kaushik wanted to commit suicide for this reasons avn