बॉलिवूड अभिनेत्री आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आजमी या त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी बऱ्याचदा चर्चेत असतात. आपल्या अभिनयातून त्या कित्येक रासिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहेत, याबरोबरच त्या त्यांच्या रोखठोक मतांसाठी बऱ्याच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शबाना पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’चे बॉक्स ऑफिसवरील आकडे बघता येणाऱ्या काळात चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस येतील अशा आशयाचं वक्तव्य शबाना यांनी केलं आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शबाना आजमी म्हणाल्या, “मला पठाण हा चित्रपट प्रचंड आवडला, या चित्रपटाला मिळालेलं यश हे खरंच चित्रपटसृष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे लवकरच बॉयकॉट कल्चर संपुष्टात येईल अशी मी आशा करते.”

आणखी वाचा : “आपण फार उतावीळ…” ‘भीड’ या चित्रपटाला भारत विरोधी म्हणणाऱ्यांना पंकज कपूर यांचं सडेतोड उत्तर

पुढे त्या म्हणाल्या “काही गोष्टी मी खूप मनाला लावून घेते किंवा त्यामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतवून घेते. म्हणूनच या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशासाठी मी खूप आनंदी आहे. मी ‘पठाण’चा मनसोक्त आनंद घेतला आहे.” याबरोबरच चित्रपटसृष्टीबद्दल शबाना आजमी म्हणाल्या, “सध्या चित्रपटसृष्टीमध्ये मंथन सुरू आहे जे खूप उत्तम आहे. लोक चित्रपटाच्या कंटेंटकडे जास्त लक्ष देत आहेत. ज्याचा कंटेंट दमदार ती गोष्ट चालणार, आणि आपण याकडेच लक्ष द्यायला हवं.”

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसची गणितंच फिरवली. या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींहून अधिक तर भारतात ५१२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. शबाना आजमीसुद्धा लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, तर शबाना आजमी यांच्याबरोबर धर्मेंद्रसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi is hopeful about change in industry says success of pathaan will cancel boycott culture avn