अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तरचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त दिग्गज अभिनेत्री व फरहानची सावत्र आई शबाना आझमी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पूर्ण अख्तर कुटुंब एकत्र पाहायला मिळालं. तसेच शबाना यांनी फरहानसाठी खूप गोड कॅप्शन लिहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शबाना यांनी फरहानला बेटू म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. “वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटू फरहान अख्तर. आनंदी राहा, खूप सारं प्रेम,” असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये जावेद अख्तर, त्यांची पहिली पत्नी हनी इराणी, फरहान अख्तर, त्याची पत्नी शिबानी दांडेकर, जोया अख्तर दिसत आहेत.

“अक्षय कुमारच्या स्टाफपेक्षा कमी मानधन मिळालं अन् त्यांच्यासमवेत…”, मुश्ताक खान यांचा खुलासा; म्हणाले, “दुर्दैवाने…”

या फोटोवर कमेंट करत चाहते फरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शबाना आझमी यांनी फरहानसाठी पोस्ट केल्याने चाहते आनंद व्यक्त करत आहेत. त्यांनी त्याला बेटू म्हटल्याचंही अनेक नेटकरी कमेंट करून शबाना यांचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi post for farhan akhtar birthday calls him betu family photo viral hrc