Shabana Azmi on not having Kids: शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचे लग्न १९८४ मध्ये झाले. दोघांच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत. शबाना व जावेद यांच्याकडे एक आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते. दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. शबाना यांचे जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलांबरोबर म्हणजेच फरहान अख्तर व झोया अख्तर यांच्याशी चांगलं नातं आहे. एका मुलाखतीत शबाना यांनी त्यांना मुलं नसण्याबद्दल वक्तव्य केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००० साली शबाना यांनी सिमी ग्रेवालला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत स्वावलंबी महिलेसाठी लग्नाचे महत्त्व काय असं शबाना यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर आपल्याला मुलं नसल्याने आपली गोष्ट वेगळी असल्याचं शबाना म्हणाल्या होत्या. “मुलं न होऊ शकल्याने माझ्यासाठी काही चॉइसेस खूप सोप्या झाल्या, कारण मी माझा जास्त वेळ कामासाठी देऊ शकले. माझ्यामते, मातृत्वात स्त्रीचा खूप कस लागतो.”

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

मला विश्वासच बसत नव्हता – शबाना आझमी

आई होऊ शकत नाही हे कळाल्यावर निराशा झाली होती का, असं विचारल्यावर शबाना म्हणाल्या, “नाही. खरं तर मलाही हे पाहून आश्चर्य वाटलं होतं, कारण सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की मी आई होणार नाही. मला खात्री होती की मी इतकी खास आहे की हा देवाने मला दिलेला अधिकार आहे. पण तरीही बाळ होणार नाही हे मी किती सहजपणे स्वीकारले हे पाहून मला आश्चर्य वाटलं. जेव्हा मला समजलं की आपल्याला मुलं होऊ शकत नाहीत, त्यामुळे मी त्याचा फार विचार करून स्वतःला त्या गोष्टीसाठी दुःखी होऊ दिलं नाही. मी त्या टप्प्यातून पुढे जायचं ठरवलं कारण मी करू शकलेल्या इतर अनेक गोष्टींसाठी मी खूप आभारी होते.”

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

मूल दत्तक घेण्याबाबत शबाना आझमी म्हणालेल्या…

मूल दत्तक घेण्याबाबत विचारल्यावर शबाना म्हणालेल्या, “मला कधीही मूल दत्तक घ्यायचे नव्हते. कधीच नाही.” कारण विचारल्यावर त्यांनी फरहान आणि झोयाची नावे घेतली. “माझी जावेदच्या मुलांशी खूप चांगली मैत्री आहे, त्यामुळे ती गरज पूर्ण झाली. ते मोठे झाले आहेत, त्यामुळे मला त्यांचे कपडे बदलायची किंवा त्यांच्या मलेरियाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ती हुशार मुलं आहेत ज्यांच्याशी मी विचारांची देवाणघेवाण करते आणि या वयात ते आपली मतं ठामपणे तुमच्यासमोर मांडतात. त्यांच्यामध्ये नवीन कल्पना येताना तुम्ही पाहू शकता. या वयोगटातील मुलं मला खूप आवडतात,” असं शबाना म्हणाल्या होत्या.

जावेद अख्तर व त्यांचे कुटुंब (फोटो – इन्स्टाग्राम)

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

‘तुम्ही जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं तेव्हा फरहान आणि झोयाने विरोध केला होता का?’ असं विचारल्यावर “त्यावेळी ते खूप लहान होते” असं शबाना म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabana azmi reaction on not having kids with javed akhtar hrc